Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:17
36 Iomraidhean Croise  

कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.


तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो;


तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो.


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पाहा, मला ओळखणारा कोणी नाही; मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची पर्वा करणारा कोणी नाही.


तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.


“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.


“मी रोगी आहे” असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.


सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो.


घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.


असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही.


हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस.


“अहो मला सोडून जाणार्‍या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हांला वाटेवर आणीन.” पाहा, आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस.


तुझी दाद लावणारा कोणी नाही; तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही.


“हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.


तर पाहा, मी ह्या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांना बरे करीन, आणि शांती व सत्य ह्यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रकट करीन.


गिलादात मलम नाही काय? तेथे कोणी वैद्य नाही काय? माझ्या लोकांच्या कन्येचे घाय का बरे झाले नाहीत?


येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.


तू इस्राएलाच्या पर्वतांविरुद्ध म्हणालास की, ‘ते उद्ध्वस्त झाले आहेत, ते आम्हांला भक्षण करण्यासाठी दिले आहेत,’ हे तुझे सर्व दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.


ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की, ‘हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.’


मीच एफ्राइमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan