Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:10
40 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझ्यावर लादलेले कठीण दास्य ह्यांपासून परमेश्वर तुला आराम देईल,


तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील.


भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुझा वंश उगवतीकडून आणीन; मावळतीकडून तुला मी एकत्र करीन.


तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक;


परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व साहाय्यकर्ता असे म्हणतो; हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशुरूना, भिऊ नकोस.


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”


हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्‍चिमेकडून येत आहेत; हे सीनी लोकांच्या देशातून येत आहेत.”


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.


मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील.


मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’


तर ‘उत्तर देशांतून व ज्या ज्या देशांत इस्राएल घराण्याच्या संतानाला हाकून लावले होते त्यांतून ज्याने त्यांना आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील.”


परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.


परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.


त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.


कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


त्या दिवसांत यहूदाचा उद्धार होईल व यरुशलेम सुरक्षित वसेल आणि ‘परमेश्वर आमची नीतिमत्ता’ हे नाव तिला देतील.


तू आपल्या बहिणीस आपल्याहून निर्दोष ठरवलेस ह्याची अप्रतिष्ठा तू भोग; तू त्यांच्याहून घोर पापे केल्यामुळे तुझ्या मानाने त्या अधिक निर्दोष मानल्या पाहिजेत; तुझ्या बहिणी अधिक नीतिमान आहेत हे तू दाखवलेस, म्हणून तू फजीत व लज्जित हो.


तू म्हणशील, ‘ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही त्यांवर मी चढाई करीन; जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत, व ज्यांपैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत त्यांच्यावर मी चालून जाईन;’


“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.


त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.


मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.


हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल.


अगे भूमी, भिऊ नकोस; उल्लास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत.


तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्‍यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.”


“हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस; पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो!” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan