Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी म्हणालो, ‘हे सर्व केल्यावर तरी तिने माझ्याकडे परत यावे ना?’ पण ती आली नाही; तिची बेइमान बहीण यहूदा हिने हे पाहिले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:7
15 Iomraidhean Croise  

तो आपल्या बापाच्या देवाला शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला; इस्राएलांच्या कृतीप्रमाणे तो वागला नाही.


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


“हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.


कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.


तुझ्या डावीकडे आपल्या कन्यांसह राहणारी शोमरोन ती तुझी थोरली बहीण आणि तुझ्या उजवीकडे आपल्या कन्यांसह राहणारी सदोम ही तुझी धाकटी बहीण.


तू त्यांच्या मार्गांनी व त्यांच्या अमंगळ कृत्यांप्रमाणे थोडीथोडकी चाललीस असे नाही, तर तू आपला सर्व आचार त्यांच्यापेक्षाही भ्रष्ट केलास.


माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


दोन-तीन गावे पाणी पिण्यासाठी एका गावात पडत-झडत गेली, त्यांची तृप्ती झाली नाही; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan