Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:3
28 Iomraidhean Croise  

मग दुसर्‍या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “पाहा, काल रात्री मी बापापाशी निजले, तर आज रात्रीही आपण त्याला द्राक्षारस पाजू आणि तू त्याच्यापाशी जाऊन नीज; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.”


त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्‍चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.


दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो.


मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.


अवर्षणाविषयी यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.


त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.


पृथ्वीवर पाऊस न पडल्याने जमीन व्याकूळ झाली आहे; म्हणून शेतकरी फजीत होऊन आपली डोकी झाकून घेत आहेत.


“तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे; आणि योशीयाच्या दिवसांत मी तुझ्याबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्राएल, यहूदा व सर्व राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ.


‘जो परमेश्वर आमचा देव आम्हांला पाऊस देतो, योग्य समयी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो, जो कापणीची नेमलेली सप्तके आमच्यासाठी राखून ठेवतो त्याचे भय आम्ही धरू,’ असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत.


तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला?


पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाहीत; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे.


तुमच्या बळाचा गर्व मी मोडून टाकीन. तुम्हांला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन;


“कापणीला अद्यापि तीन महिने आहेत तोच पाऊस तुमच्याकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरला; तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये, असे मी केले; एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही; ते सुकून गेले.


दोन-तीन गावे पाणी पिण्यासाठी एका गावात पडत-झडत गेली, त्यांची तृप्ती झाली नाही; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये;


तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे; तो काही अन्याय करत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही.


मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.”


तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायांखालची जमीन लोखंडासारखी होईल.


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan