Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आमच्या बालपणापासून आमच्या वडिलांचे श्रमफळ म्हणजे त्यांची शेरडेमेंढरे, त्यांची गुरेढोरे, त्यांचे पुत्र व कन्या ह्यांना ह्या लज्जास्पद दैवताने ग्रासून टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आमच्या तारुण्यापासून लाजिरवाण्या दैवतांनी आमच्या पूर्वजांच्या कष्टाची फळे— त्यांच्या जनावरांचे थवे व कळप, त्यांचे पुत्र आणि कन्या गिळंकृत केले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:24
12 Iomraidhean Croise  

हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे; यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी म्हणजे अर्थात बआलमूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडल्या आहेत.


तुझी सुखसोय असता मी तुझ्याबरोबर बोललो, तेव्हा तू म्हणालीस, ‘मी ऐकणार नाही.’ माझे म्हणणे ऐकू नये ही लहानपणापासून तुला खोड आहे.


ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?


“त्याच्या घोड्यांचे फुरफुरणे दानातील नगरांतून ऐकू येते; त्याच्या वारूंच्या मोठ्या खिंकाळण्यांनी सर्व भूमी हादरत आहे; ते येऊन देश व त्यातील सर्वस्व, नगर व त्यातील रहिवासी ह्यांना ग्रासून टाकतात.


त्यांनी त्वरा करून आमच्यासाठी शोकगीत म्हणावे म्हणजे आमच्या नेत्रांतून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहतील.


मी भाकर, सपीठ, तेल व मध तुला देत असे व तुला भरवत असे, तीही तू त्यांच्यापुढे सुगंधी अर्पण ठेवलेस म्हणून हे असे घडत असे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


आणखी माझ्यापासून तुला पुत्र व कन्या ही झालीं, ती तू घेऊन त्यांना खाऊन टाकण्यासाठी बळी म्हणून अर्पण केलीस. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहीत;


तू आपल्या वडील बहिणी व आपल्या धाकट्या बहिणी ह्यांचा अंगीकार करशील तेव्हा तू आपले आचरण स्मरून लज्जित होशील, आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून देईन.


तू जे सर्व केलेस त्याची मी क्षमा करीन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;


तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.


रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan