Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 निश्चितच डोंगरावरील गोंधळ व पर्वतावरील फसवणूक; निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह हेच इस्राएलचे तारण आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:23
25 Iomraidhean Croise  

तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)


माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे;


लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.


त्या दिवशी असे होईल की इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, आपणांस ताडन करणार्‍याचा ह्यापुढे आश्रय धरून राहणार नाहीत; तर परमेश्वराचा, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आश्रय ते खर्‍या मनाने करतील.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.


कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्‍यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्‍यांना लज्जा प्राप्त होईल.


हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचीत गूढ देव आहेस.


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”


तरी तू आमचा पिता आहेस; अब्राहाम आम्हांला जाणत नाही; इस्राएल आम्हांला ओळखत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे.


हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास?


हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस.


कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरामूर्ती ह्यांचे स्मरण ठेवते.


ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला.


कारण परमेश्वर म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा; राष्ट्रांच्या अग्रेसराचा जयजयकार करा; घोषणा करा, स्तवन करा व म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्राएलाच्या अवशेषाचा उद्धार कर.’


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan