Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे, इस्राएलवंशजांच्या आक्रंदनाचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे; कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे, ते आपला देव परमेश्वर ह्याला विसरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत. कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:21
24 Iomraidhean Croise  

तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्‍चित्त मला मिळाले नाही;


सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.


मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते.


बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस;


कोणाला घाबरून, कोणाला भिऊन तू लबाडी केलीस, माझे स्मरण ठेवले नाहीस, परिणामांची पर्वा केली नाहीस? मी दीर्घ काळ स्तब्ध राहिलो, म्हणूनच का तू माझे भय धरले नाहीस?


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा, माझ्याकडून तुला मापून दिलेला वतनभाग आहे; कारण तू मला विसरलीस व खोट्यावर भरवसा ठेवलास.


तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.


कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत.


डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.


ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.


हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तू मला विसरली आहेस, व तू माझ्याकडे पाठ फिरवली आहेस, म्हणून तू आपल्या कामासक्तीचे व व्यभिचाराचे फळ भोग.”


त्यांतले काही निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोर्‍यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील.


जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले; ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले.


कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.


याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.


परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते;


कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan