Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा. असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही? रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस, एखाद्या अरबीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस. आपल्या कुकर्माने व जारकर्माने तू सर्व भूमी दूषित केली आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:2
22 Iomraidhean Croise  

तेव्हा तिने आपली वैधव्यवस्त्रे उतरवली. बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिम्नाच्या सडकेवरील एनाईम गावच्या वेशीजवळ ती जाऊन बसली; शेला प्रौढ झाला असूनही अजून आपल्याला त्याची बायको केले नाही असे तिला दिसून आले होते.


त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्न्या होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले.


आणि इस्राएलाचा राजा शलमोन ह्याने यरुशलेमेच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेथ, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्याप्रीत्यर्थ जी उच्च स्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली.


त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या ह्यांचे रक्त पाडले; त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली.


ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.


ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत;


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो.


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो.


उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे, इस्राएलवंशजांच्या आक्रंदनाचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे; कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे, ते आपला देव परमेश्वर ह्याला विसरले आहेत.


तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला.


हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’


तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणांसाठी सजवलीस आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हायची नाही अशी शिंदळकी त्यांवर केलीस.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’


तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.


जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल, त्यांतले लोक ज्या ज्या ठिकाणी, उंच डोंगरांवर, टेकड्यांवर आणि हरतर्‍हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan