Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:18
22 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुझा वंश उगवतीकडून आणीन; मावळतीकडून तुला मी एकत्र करीन.


मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;


तर ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना उत्तर देशातून व ज्या देशांत त्यांना त्याने हाकून लावले होते त्या देशांतून आणले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ’ असे म्हणतील; कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यात त्यांना मी परत आणीन.


तर ‘उत्तर देशांतून व ज्या ज्या देशांत इस्राएल घराण्याच्या संतानाला हाकून लावले होते त्यांतून ज्याने त्यांना आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील.”


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”


पाहा, मी त्यांना उत्तरेच्या देशांतून आणीन, त्यांना पृथ्वीच्या दिगंताहून जमा करीन; त्यांच्यामध्ये आंधळे व पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या असतील; मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील.


त्या दिवसांत, त्या काळी, लोक इस्राएलाचे दुष्कर्म शोधतील, पण ते नसणार; यहूदाची पातके शोधतील पण त्यांना ती सापडायची नाहीत; कारण ज्यांना मी वाचवून ठेवीन त्यांना मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत, त्या काळी इस्राएल लोक येतील, ते व यहूदाचे लोक जमून येतील; ते वाटेने रडत येतील, परमेश्वर आपला देव ह्याला शरण येतील.


ते सीयोनाची वाट विचारतील, आपली तोंडे इकडल्या रस्त्यांकडे करून म्हणतील, ‘चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू.’


तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन.


ह्यास्तव असे म्हण : ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला राष्ट्रांतून गोळा करून आणीन; ज्या ज्या देशांत तुम्ही पांगला आहात त्यांतून मी तुम्हांला गोळा करून घेईन, आणि इस्राएल देश तुम्हांला देईन.’


यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.


एफ्राइमाने लबाड्यांनी मला घेरले आहे; इस्राएलाच्या घराण्याने कपटाने मला घेरले आहे. देव जो सत्य व पवित्र त्याच्याबरोबर यहूदाही बेबंदपणाने वागतो.


“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;


मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यांना दिली आहे तिच्यातून त्यांना ह्यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही,” असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.


मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.


अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan