Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:1
34 Iomraidhean Croise  

त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या ह्यांचे रक्त पाडले; त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली.


पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


“लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत.


“अहो मला सोडून जाणार्‍या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हांला वाटेवर आणीन.” पाहा, आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस.


तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला.


हे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”


“परमेश्वर म्हणतो, हे इस्राएले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस,


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


मोठ्या शरीराचे तुझे शेजारी मिसरी लोक ह्यांच्याबरोबर तू शिंदळकी केलीस; मला चिडवण्यासाठी तू मनस्वी शिंदळकी केलीस;


प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वच्छंदी वेश्येच्या कृतीप्रमाणे हे सर्व केलेस; तेव्हा तुझे मन किती दुर्बळ आहे!


ह्याकरता अगे वेश्ये, परमेश्वराचे वचन ऐक :


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;


उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.


म्हणून तू त्यांना असे सांग : ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन,’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते.


वडीलवर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा; कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्राएलात भ्रष्टाचार केला आहे; ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


एकदा रागाच्या भरात ती त्याला सोडून यहूदातील बेथलेहेम यहूदा येथे आपल्या बापाच्या घरी गेली व तेथे चार महिने राहिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan