Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 29:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ज्यांना यहूदाचा राजा सिद्कीया याने बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्याकडे एलास शाफानाचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा यांच्या हस्ते पत्र पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यिर्मयाहने शाफानचा पुत्र एलासाह व हिल्कियाहचा पुत्र गमर्‍याह यांच्याकडे सुपूर्द ते केले, जे यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरकडे पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 29:3
11 Iomraidhean Croise  

त्यांनी राजाला बोलावणे पाठवले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले.


मग त्याने हिल्कीया याजक, अहीकाम बिन शाफान, अखबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,


मुख्य याजक हिल्कीया ह्याने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचला.


अजर्‍यास हेलस झाला, हेलसाला एलासा झाला;


शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्‍या झाला,


मग राजाने हिल्कीया, अहीकाम बिन शाफान, अब्दोन1 बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,


मग यहोयाकीमाने मिसर देशात माणसे पाठवली; त्याने अखबोराचा पुत्र एलनाथान ह्याच्याबरोबर काही माणसे देऊन त्याला मिसर देशात पाठवले.


शाफानाचा पुत्र अहीकाम ह्याचे यिर्मयाला पाठबळ होते म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही व त्यांनी त्याला ठार मारले नाही.


राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्‍या ह्यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही.


ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला.


त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan