Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 29:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तू आपल्याच नावाने यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांना, मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्याला व सर्व याजकांना पत्रे पाठवून कळवले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरूशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 29:25
16 Iomraidhean Croise  

हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले.


मग “कूशाचा राजा तिर्‍हाका तुझ्याशी लढायला निघाला आहे” असे कोणी बोलताना त्याने ऐकले; हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,


इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची निंदा करावी व त्याच्याविरुद्ध बोलावे ह्या हेतूने त्याने पत्रेही पाठवली; त्यात त्याने लिहिले की, “निरनिराळ्या देशांतील राष्ट्रांच्या देवांना आपले लोक माझ्या हातातून सोडवता आले नाहीत, त्याप्रमाणेच हिज्कीयाच्या देवाला आपले लोक माझ्या हातून सोडवता यायचे नाहीत.”


त्या काळात यहूदातल्या महाजनांची पत्रे तोबीयास जात असत व तोबीयाची पत्रे त्यांना जात असत.


ते माझ्यासमोर त्याच्या सत्कृत्यांची तारीफ करत आणि माझे शब्द त्याला जाऊन सांगत. तोबीया मला घाबरवण्याकरता पत्रे पाठवत असे.


पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले.


मग पकडून नेलेल्या लोकांतील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुखद्नेस्सराने पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले होते त्या सर्वांना यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेहून पत्र पाठवले.


हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखवले.


तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”


गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले;


त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan