Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 29:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग पकडून नेलेल्या लोकांतील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुखद्नेस्सराने पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले होते त्या सर्वांना यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेहून पत्र पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरूशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरूशलेमेहून पत्र पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 29:1
16 Iomraidhean Croise  

तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार व खोजे ह्यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला; बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी त्याला पकडले.


वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.


मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोकांना पत्रे पाठवली.


त्याप्रमाणे त्याच वर्षी सातव्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.


यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”


बंदिवासातले लोकहो, ज्या तुम्हांला मी यरुशलेमेहून बाबेलास पाठवले ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ ह्यांनी तुम्हांला फसवू नये; तुम्ही ज्यांना स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका.


यिर्मया सरायास म्हणाला, “तू बाबेलास पोहचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच;


त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवले : “अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम.


मी आपल्या पत्राने तुम्हांला दु:ख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते; कारण त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दु:ख झाले असे मला दिसते.


पाहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हांला लिहीत आहे.


बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan