Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, ‘मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन; तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून ह्या वर्षी तू खरोखर मरशील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:16
16 Iomraidhean Croise  

अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.”


ह्या गोष्टीने यराबामाच्या घराण्याला पाप लागले व तेणेकरून त्याचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले.


त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो.


हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”


त्याप्रमाणे त्याच वर्षी सातव्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे ह्या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व दोन वर्षांच्या आत मी ह्या स्थळी परत आणीन.


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी नेहेलमी शमाया व त्याचे वंशज ह्यांना शिक्षा करीन; ह्या लोकांत राहून त्याचे नाव घ्यायला त्याचे कोणी उरणार नाही; मी आपल्या लोकांचे अनिष्ट करणार ते तो पाहणार नाही. कारण तो परमेश्वराविरुद्ध फितुरीचे शब्द बोलला आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


पाहा, प्रभू परमेश्वराचा डोळा ह्या पापिष्ट राज्यावर आहे; मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन; याकोबाचे घराणे मात्र मी समूळ नष्ट करणार नाही,” असे परमेश्वर म्हणतो.


ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले.


सातव्या दिवशी सात गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;


कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan