Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:13
10 Iomraidhean Croise  

माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखी भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, तर मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.”’


कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.


त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात.


“परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन.


परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.”


परमेश्वर मला म्हणाला, “तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव.


माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.


म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan