Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 गंगाळसागर, स्तंभ, गंगाळाच्या बैठकी व इतर पात्रे ह्या नगरात उरली होती त्यांविषयी सेनाधीश परमेश्वर ह्याप्रमाणे म्हणतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जे खांब व जो ओतीव समुद्र व ज्या बैठकी व बाकीची पात्रे या नगरात उरली आहेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कारण स्तंभ, कास्याचे गंगाळ, धातूच्या बैठकी व या नगरात उरलेल्या इतर वस्तूंच्या बाबतीत सर्वसमर्थ याहवेह म्हणतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:19
10 Iomraidhean Croise  

मग त्याने एक गंगाळसागर ओतवला होता; त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्याचा परीघ तीस हात होता.


त्याने पितळेचे दहा चौरंग केले होते; प्रत्येक चौरंगाची लांबी चार हात, रुंदी चार हात व उंची तीन हात होती.


परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे पितळ बाबेलास नेले.


एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्‍या खांबालाही असेच जाळीचे काम होते.


देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.


वैर्‍याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस.


प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan