Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ते जर संदेष्टे असले व परमेश्वराचे वचन त्यांच्याजवळ असले तर परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत जी पात्रे उरली आहेत ती बाबेलास जाऊ नयेत अशी त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करून पाहावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जर ते खरेच संदेष्टे असतील आणि त्यांच्याकडे खरेच परमेश्वराकडून वचन मिळाले असेल, परमेश्वराच्या मंदिरात व यहूदाच्या राजाच्या घरात व यरूशलेमेमध्ये ज्या वस्तू उरल्या आहेत, ती बाबेलास जाऊ नयेत, म्हणून त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जर ते संदेष्टे असतील व त्यांच्याकडे याहवेहचे वचन असेल तर, याहवेहच्या मंदिरातील सुवर्णपात्रे मंदिरात व यहूदीयाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहवी, ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेहस विनंती करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:18
18 Iomraidhean Croise  

मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासी ह्यांना बरे केले, आणि त्यांना मुले होऊ लागली.


तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.”


मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.


ह्यावरून हिज्कीया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज ह्या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


बर्‍याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.


यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,


ह्याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस; कारण मी ऐकणार नाही.


तेव्हा त्यात नोहा, दानीएल व ईयोब हे तिघे असले तरी फार झाले; ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही.


आता परमेश्वराने आमच्यावर करुणा करावी म्हणून देवाचा अनुग्रह मागा; तुमच्या हातून हे घडले आहे; तुमच्या ह्या कृत्यामुळे तो कोणावर प्रसन्न होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तेव्हा सर्व लोक शमुवेलास म्हणाले, “आपल्या दासांप्रीत्यर्थ आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही; आम्ही राजा मागितला त्यामुळे आमच्या एकंदर पातकांना हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे.”


तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हांला चांगला व सरळ मार्ग दाखवतो.


इस्राएल लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवावे म्हणून त्याची काकळूत करण्याचे थांबवू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan