Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना बाहेर पाठवले नाही. ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात यासाठी की, मी तुम्हास बाहेर काढून टाकावे आणि तुम्ही व जो कोणी संदेष्टा तुम्हास भविष्य सांगतो त्या दोघांनी नष्ट व्हावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:15
27 Iomraidhean Croise  

तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


परमेश्वर मला म्हणाला, “संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टान्त, शकुन, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हांला सांगतात.


हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”


ह्याकरता सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्याविषयी म्हणतो, “पाहा, मी त्यांना खायला कडूदवणा व प्यायला विष देईन, कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.”


“मी ह्या संदेष्ट्यांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले; मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला;


‘मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे.


कारण मी तुम्हांला तुमच्या देशातून घालवावे, तुम्हांला हाकून लावावे व तुम्ही नष्ट व्हावे म्हणून ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ ह्यांनी तुम्हांला फसवू नये; तुम्ही ज्यांना स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका.


कारण ते माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan