Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 जे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करू नका’ त्यांची वचने ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जे कोणी संदेष्टे तुम्हाशी बोलतात आणि म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, कारण ते तुम्हास खोटे भविष्य सांगतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ असे सांगणार्‍या संदेष्ट्यांचे ऐकू नका, कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:14
20 Iomraidhean Croise  

परमेश्वर मला म्हणाला, “संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टान्त, शकुन, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हांला सांगतात.


“मी ह्या संदेष्ट्यांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले; मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला;


‘मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे.


मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस.


तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’


पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan