Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जे राष्ट्र बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही त्याविषयी परमेश्वराने सांगितले आहे की, तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी ते मरेल, त्याप्रमाणे तू व तुझे लोक का मरता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करण्यास नकार देतील, त्याविषयी परमेश्वराने जसे जाहीर केले तसे तू आणि तुझे लोक तलवारीने, दुष्काळाने व मरीने का मरता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेहने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:13
11 Iomraidhean Croise  

परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.”


मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”


पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.


“परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल.


यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला विनवतो की, मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी आहे असे समजून ती पाळ, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल.


तुझी सर्व बायकापोरे खास्द्यांकडे नेतील; तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस, बाबेलच्या राजाच्या हाती पडशील; तू हे नगर अग्नीने जाळण्यास कारण होशील.”


तर मग मी तलवार, दुष्काळ, हिंस्र पशू व मरी ही माझी चार्‍ही उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशू ह्यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन, तेव्हा त्याचा निभाव कसा लागेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तरीपण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप ह्यामुळे तो मरेल.


तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


Lean sinn:

Sanasan


Sanasan