Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 शाफानाचा पुत्र अहीकाम ह्याचे यिर्मयाला पाठबळ होते म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही व त्यांनी त्याला ठार मारले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:24
21 Iomraidhean Croise  

ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


यहूदा देशातील जे लोक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने राहू दिले होते त्यांच्यावर त्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला सुभेदार नेमले.


मग राजाने हिल्कीया, अहीकाम बिन शाफान, अब्दोन1 बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,


ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता :


परमेश्वराच्या नवीन द्वाराच्या देवडीजवळ वरच्या चौकातील शाफानाचा पुत्र गमर्‍या लेखक ह्याच्या दिवाणखान्यात बारुखाने परमेश्वराच्या मंदिरात, ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखवली.


मीखाया बिन गमर्‍या बिन शाफान ह्याने त्या ग्रंथातील परमेश्वराची सर्व वचने ऐकली,


तेव्हा तो राजगृहात, लेखकाच्या दिवाणखान्यात गेला; तर तेथे सर्व सरदार बसले होते; अलीशामा लेखक, दलाया बिन शमाया, एलनाथान बिन अखबोर, गमर्‍या बिन शाफान, सिद्कीया बिन हनन्या व इतर सर्व सरदार तेथे होते.


मग ते सरदार बारुखाला म्हणाले, “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.”


तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.


ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला.


त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता.


असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.


तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्‍यास जावे,


परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan