Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 “यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 “ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:18
13 Iomraidhean Croise  

तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावेत?


तथापि हिज्कीया आणि यरुशलेमकर आपल्या हृदयाच्या उन्मत्ततेविषयी अनुताप पावून नम्र झाले, म्हणून परमेश्वराचा क्रोध हिज्कीयाच्या काळात त्यांच्यावर भडकला नाही.


तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्‍यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?”


हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत.


हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन.


बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan