Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजनपूजन करण्यास त्यांच्यामागे जाऊ नका, म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणून दुसऱ्या दैवतांना अनुसरायला आणि त्यांना पाया पडायला त्यांच्या मागे जाऊ नका आणि तुम्ही त्यास आपल्या हातांच्या कामाने मला राग आणू नका, म्हणजे मी तुमचे काही वाईट करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 इतर दैवतांची सेवा करण्यासाठी त्यांचे अनुसरण करू नका व त्यांची उपासना करू नका; तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकवू नका. तर मी तुम्हाला अपाय करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:6
17 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते यहूदाचे लोक करू लागले; त्यांच्या पूर्वजांपेक्षाही त्यांनी जी अधिक पातके केली त्यामुळे त्यांनी परमेश्वराला ईर्ष्येस पेटवले.


परमेश्वराने याकोबाच्या वंशजांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “तुम्ही अन्य देवांचे भय धरू नका, त्यांना नमन करू नका, त्यांची उपासना करू नका व त्यांना बली अर्पू नका;”


तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.


माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत.


कारण इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज ह्यांनी तरुणपणापासून माझ्या दृष्टीने अगदी वाईट ते केले; इस्राएलाचे वंशज आपल्या हातच्या कर्मांनी केवळ मला संतापवत आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?


कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.


परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही,


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचवले,


ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यांच्यापासून उजवीडावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस तर असे घडेल.


तुम्ही अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांच्या देवांच्या मागे लागू नका;


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर खात्रीने तुमचा नाश होईल हे मी तुम्हांला प्रतिज्ञापूर्वक सांगतो.


तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan