यिर्मया 25:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते संदेष्टे म्हणाले, “प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, आणि जे राष्ट्र परमेश्वराने तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना कायमचा राहण्यास दिला, त्यामध्ये जा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांनी तुम्हाला संदेश दिला: “तुम्ही प्रत्येकजण तुमच्या दुष्ट मार्गापासून व जी दुष्कर्मे करीत आहात त्यापासून मागे फिरा, तरच याहवेहने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्वकाळासाठी दिलेल्या या देशात तुम्ही राहाल. Faic an caibideil |
मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.