Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 त्या शांत कुरणांचा नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवंट होतील. परमेश्वराचा संतप्त क्रोध हा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 आता शांत कुरणे उजाड होतील याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:37
10 Iomraidhean Croise  

परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो!


कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.


कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.


बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे, त्यांनी माझे वतन पायाखाली तुडवले आहे, त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे.


त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”


“उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे?


मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे.


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan