यिर्मया 25:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा. कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; मानवजातीच्या कळपांच्या पुढार्यांनो, धुळीत लोळा. कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल. Faic an caibideil |