Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “अरिष्टे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पुढे जाणार, आणि पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून वादळाची सुरुवात होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “पाहा! विपत्ती पसरत आहे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात; पृथ्वीच्या टोकापासून एक भयंकर वादळ उठत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:32
12 Iomraidhean Croise  

राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे;


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे; त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करण्यास लावले आहे.


त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांची धनुष्ये सज्ज केली आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारेसारखे, त्यांची चाके वावटळीसारखी आहेत.


मी त्यांची कृत्ये व त्यांचे विचार जाणतो; सर्व राष्ट्रांनी व भिन्नभिन्न भाषा बोलणार्‍यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यांना एकत्र करावे अशी वेळ आली आहे.


पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


पाहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे; धुव्वा उडवणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.


ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


मग त्याने त्यांना म्हटले, “‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल;


तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan