Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तो आवाज पृथ्वीच्या शेवटापर्यंत येणार, कारण परमेश्वराचा विवाद राष्ट्रांविरूद्ध आहे, तो त्यांचा न्यायनिवाडा करणार. आणि तो सर्व देहावर न्यायव्यवस्था चालवणार. दुष्टांना तो तलवारीस देणार.” परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” याहवेहची ही घोषणा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:31
14 Iomraidhean Croise  

कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली.


कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे; त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करण्यास लावले आहे.


सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.


कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.


तरी तू म्हणालीस, ‘मी निर्दोष आहे, त्याचा राग माझ्यावरून फिरलाच आहे;’ तू म्हणालीस, ‘मी पाप केले नाही’ म्हणून पाहा, मी तुझ्याशी दावा चालवीन.


पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नकोस, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो; पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”


कारण दिवस समीप आला आहे; परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; तो अभ्रमय दिवस आहे; तो विधर्म्याचा शासनदिन आहे.


मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.


परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट2 ह्या नावाच्या खोर्‍यात आणीन आणि माझे लोक, माझे वतन इस्राएल, ह्यांना त्यांनी राष्ट्रांत विखरून माझा देश वाटून घेतला म्हणून तेथे त्यांच्यावर दावा मांडीन.


पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan