यिर्मया 25:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ह्यास्तव तू त्यांना ह्या सर्व वचनांचा संदेश सांग; त्यांना असे सांग की, ‘परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील; तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील; तो आपल्या कळपावर गर्जना करील; द्राक्षे तुडवणार्यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 “तर यिर्मया, तू त्यांना हे भविष्यवचन सांग, त्यांना बोल: परमेश्वर उंचावरुन गर्जना करतो, आणि त्याच्या पवित्र मंदिरातून आपला शब्द उच्चारील, तो त्याच्या कळपाविरूद्ध गर्जना करील. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, तसा, देशाच्या सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तो ओरडेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग: “ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील; त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध. द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील, Faic an caibideil |