Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळचे राजे या सर्वांना, या पृथ्वीवर असणारे सर्व, आपल्या राज्यांसहीत, भावांसहीत, त्या सर्वांना मी तो प्याला प्या प्यायला लावला आहे. पण बाबेलचा राजा, त्या सर्वांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:26
12 Iomraidhean Croise  

ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


शेशख1 कसे हस्तगत झाले आहे! सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहाती कसा गेला आहे! राष्ट्रांना बाबेल कसा विस्मयावह झाला आहे!


‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’


उत्तरेकडील सरदार व वधलेल्यांबरोबर उतरून गेलेले सीदोनी हे सर्व तेथे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा वचक बसला होता तरी त्यांची अप्रतिष्ठा झाली; ते बेसुंती लोक तलवारीने वधलेल्यांबरोबर पडले आहेत व गर्तेत उतरणार्‍यांबरोबर अप्रतिष्ठा पावले आहेत.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan