Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तेव्हा परमेश्वराच्या हातून मी तो प्याला घेतला व ज्या राष्ट्रांकडे परमेश्वराने मला पाठवले त्या सर्वांना तो पाजला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग मी परमेश्वराच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी प्यायला लावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तेव्हा मी याहवेहच्या हातातून तो प्याला घेतला आणि त्यांनी मला ज्या राष्ट्रांकडे पाठविले, त्या प्रत्येक राष्ट्राला त्यातून प्यावयला लावले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:17
9 Iomraidhean Croise  

पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


आणि ती यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा ह्यांच्याकडे पाठव;


“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याकडे आपले तोंड करून त्याच्याविरुद्ध व सर्व मिसर देशाविरुद्ध संदेश दे.


तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले.


मी नगराचा नाश करण्यास आलो होतो तेव्हाच्या दृष्टान्ता-सारखा दृष्टान्त मी पाहिला; खबार नदीतीरी जो दृष्टान्त मी पाहिला तसे दृष्टान्त माझ्या दृष्टीस पडले; तेव्हा मी उपडा पडलो.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan