Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वर, इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवतो त्यांना तो पाज;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, त्याने मला हे सांगितले: “माझ्या हातातील क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला घे आणि मी तुला पाठवतो त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:15
27 Iomraidhean Croise  

तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो; तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो.


दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.


तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस; तू आम्हांला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस;


पाहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे; त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो; पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल.


मी तर सदा आनंद करीन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन.


सर्व पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे; सर्व राष्ट्रांवर उगारलेला हात हाच आहे.


कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे; त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करण्यास लावले आहे.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


“मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”


“तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे; आणि योशीयाच्या दिवसांत मी तुझ्याबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्राएल, यहूदा व सर्व राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ.


तो येऊन मिसर देशावर मारा करील; जे मरायचे ते मरणाच्या, जे बंदिवासात जायचे ते बंदिवासाच्या व जे तलवारीने वधायचे ते तलवारीच्या स्वाधीन करण्यात येतील.


तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नकोस, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो; पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”


परमेश्वराचे राष्ट्रांविषयी जे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते हे.


त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.


कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, न्यायाने पाहता ज्यांना पेला प्यायचा नव्हता त्यांना तो प्यावा लागेल; तर तू कोणतीही शिक्षा झाल्यावाचून राहशील काय? तू शिक्षा झाल्यावाचून राहणार नाहीस, तुला पेला प्यावाच लागेल.


बाबेल परमेश्वराच्या हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला होता; राष्ट्रे त्याचा द्राक्षारस प्याली म्हणून ती वेडी झाली आहेत.


प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपल्या बहिणीच्या पेल्यासारखा खोल व मोठा पेला पिशील, त्याचे माप मोठे असल्यामुळे तू हास्य व थट्टा ह्यांना पात्र होशील.


तू नशा व शोक ह्यांनी व्याप्त होशील. तुझी बहीण शोमरोन हिचा पेला विस्मय व विध्वंस ह्यांचा आहे.


वैराण केलेल्या देशांमध्ये मी मिसर देश वैराण करीन, उजाड केलेल्या नगरांमध्ये मी त्याची नगरे चाळीस वर्षे उजाड करीन; मी मिसर्‍यांना राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन.


राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले व सगळा अदोम ह्यांनी उल्लासयुक्त मनाने व द्वेषबुद्धीने माझा देश लुटून फस्त करण्याच्या हेतूने तो आपल्या सत्तेत घेतला; ह्यास्तव मी त्यांच्याविरुद्ध ईर्ष्यायुक्त होऊन निश्‍चितपणे बोललो आहे.


कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्यालात तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ती पिऊन बरळतील आणि होती की नव्हती अशी होतील.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan