Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्यांना राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:14
17 Iomraidhean Croise  

हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!


ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.


विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.


नगरातून कोलाहल ऐकू येतो; मंदिरातून शब्द ऐकू येतो; आपल्या शत्रूंचे पारिपत्य करणार्‍या परमेश्वराचा शब्द ऐकू येतो;


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;


पाहा, उत्तरेकडून एक राष्ट्र, मोठे राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून बहुत राजे उठत आहेत.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan