Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वर असे म्हणतो, आणि असे होईल सत्तर वर्षे संपल्यावर, मी बाबेलाच्या राजाला आणि त्या राष्ट्राला आणि खास्द्यांच्या देशाला त्यांच्या दुष्कृत्यांमुळे शिक्षा करीन.” त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:12
26 Iomraidhean Croise  

यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेसर ह्याने स्वारी केली; यहोयाकीम तीन वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला; मग त्याने त्याच्यावर उलटून बंड केले.


यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की,


हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!


तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे.


अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले.


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


बेल खचला आहे, नबो वाकला आहे; त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत; तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादल्या आहेत.


ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्‍या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो.


त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.


ती बाबेलास नेण्यात येतील व मी त्यांचा समाचार घेईपर्यंत ती तेथेच राहतील; मग मी ती तेथून घेऊन ह्या स्थली परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो.”


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.


मी तुला कायमचे उद्ध्वस्त करीन, तुझी नगरे पुन्हा वसायची नाहीत; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी दानीएल शास्त्रग्रंथावरून समजलो की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले होते.


तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan