Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल असे मी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “त्यांचे हर्ष व त्यांच्या आनंदोत्सवाचे स्वर, वर आणि वधूंचे स्वर, त्यांच्या जात्यांचे आवाज व त्यांच्या दिव्यांचा प्रकाश मी नाहीसा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:10
14 Iomraidhean Croise  

राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी.


माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”


त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.


जाते घेऊन धान्य दळ, आपला बुरखा मागे सार, वस्त्राचा घोळ उचलून धर, मांड्या उघड्या करून नदीनाल्यांतून पार चालत जा.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, तुमच्या हयातीत, तुमच्या डोळ्यांपुढे ह्या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन.


फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.


हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.


आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे; आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे.


मी तुझ्या गीतांचा ध्वनी बंद पाडीन, तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही.


तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan