Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरूशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी त्याना मी सोडून देईन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “ ‘परंतु नासके अंजीर जे इतके नासके आहेत की ते खाण्यायोग्य नाहीत, हे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी व या देशात उरलेले यरुशलेमचे सर्व लोक यांचे प्रतीक आहेत; मग ते यरुशलेमचे अवशिष्ट लोक असोत वा इजिप्तमध्ये वस्ती करून राहिलेले असोत, याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 24:8
18 Iomraidhean Croise  

योशीयाचे पुत्र : ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीया व चौथा शल्लूम.


तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तर तो कमरबंद खराब, कुचकामाचा झाला होता.


कारण मी ह्या नगराकडे तोंड केले आहे ते त्याच्या वाइटासाठी, त्याच्या बर्‍यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो; ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल.’


एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्‍या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते.


“इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ह्या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खास्द्यांच्या देशात पाठवले आहेत त्यांना ह्या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन.


कारण तुमच्याबरोबर लढणार्‍या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.”


मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”


मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव ह्याने जी वचने यिर्मयाच्या हस्ते लोकांकडे पाठवली ती सर्व त्या सर्वांना सांगण्याचे यिर्मयाने संपवले.


जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


Lean sinn:

Sanasan


Sanasan