Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्‍या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 एका टोपलीत खूप चांगली अंजीर होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजीर होती. ती खाण्यालायक नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्‍या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 24:2
11 Iomraidhean Croise  

माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली?


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


पाहा, मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन; मी त्यांना वाईट अंजिरांसारखे करीन, ते नासल्यामुळे खाववत नाहीत.


रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


पहिल्या बाराच्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडाप्रमाणे तुझे सर्व दुर्ग होतील; झाडे हलवली म्हणजे अंजीर खाणार्‍याच्या तोंडी पडतात.


ते आपल्या देशातील हरतर्‍हेचा प्रथमउपज परमेश्वराप्रीत्यर्थ आणतील तो तुझा होय; तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा.


तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan