Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 24:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी त्यांच्याविरुद्ध तलवार, दुष्काळ आणि रोगराई पाठवीन, मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत असे करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 24:10
27 Iomraidhean Croise  

बोरू पाण्यात कापतो त्याप्रमाणे परमेश्वर इस्राएलास हाणून कापवील व जी उत्तम भूमी त्याने त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यातून त्यांना उपटून काढून नदीपलीकडे त्यांची पांगापांग करील, कारण त्यांनी अशेरा मूर्ती बनवून परमेश्वराला संतप्त केले.


तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”


ते जर तुला म्हणतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, “जे मृत्यूसाठी नेमलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तलवारीसाठी नेमलेले आहेत त्यांनी तलवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे व जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे.”’


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्‍या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.


पाहा, मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन; मी त्यांना वाईट अंजिरांसारखे करीन, ते नासल्यामुळे खाववत नाहीत.


मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.


पाहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणार्‍यांचे मोर्चे लागले आहेत; तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे ह्यांच्याशी युद्ध करणार्‍या खास्द्यांच्या हाती हे लागले आहे; तू बोललास तसे घडले आहे. पाहा, हे तुला दिसत आहे.


तरी, हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खास्द्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, ‘पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव.”’


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्‍याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.


ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्‍चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही.


म्हणून ज्या स्थळी जाऊन राहण्याची तुमची इच्छा आहे तेथे तुम्ही तलवार, दुष्काळ, दुर्भिक्ष व मरी ह्यांनी मराल हे पक्के समजा.”


ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.


ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन,


आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.”


तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे तलवारीने पडतील, उघड्या मैदानात असलेल्यांना मी वनपशूंना खाऊन टाकायला देईन, दुर्गांत व गुहांत राहणारे मरीने मरतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “आपले हातपाय आपटून म्हण : इस्राएल घराण्याच्या सर्व अमंगळ दुष्कर्मांचा धिक्कार असो; ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील.


बाहेर तलवार, आत मरी व दुष्काळ; शेतात असलेला तलवारीने मरेल, नगरात असलेल्यास दुष्काळ व मरी ग्रासून टाकतील;


जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील.


मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’; आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan