Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच्या दिवसात यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षित राहील. आणि ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायीपण असे असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:6
50 Iomraidhean Croise  

दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.


तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात.


मात्र गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत.


तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.


पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.


आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे.


तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील.


“मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन;


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!


पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.


त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील.


त्या दिवसांत यहूदाचा उद्धार होईल व यरुशलेम सुरक्षित वसेल आणि ‘परमेश्वर आमची नीतिमत्ता’ हे नाव तिला देतील.


मी त्याचा विध्वंस करीन, करीनच करीन; ही स्थिती अशीच राहायची नाही; ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्याला मी सत्ता देईन.


ते त्यात निर्भय राहतील; ते घरे बांधतील, द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यांच्या सभोवतालच्या त्यांच्या द्वेष्ट्यांना मी न्यायदंड करीन तेव्हा ते निर्भयपणे वसतील; मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.”


ह्यास्तव हे मानवपुत्रा, संदेश देऊन गोगाला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा माझे लोक इस्राएल निर्भय वसतील तेव्हा हे तुला कळणार नाही काय?


ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे; यहूदाचे लोक, यरुशलेमनिवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावलेस, त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे.


यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.


पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.


एसावाच्या पहाडाचा न्याय करायला उद्धारकर्ते सीयोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल.


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्‍यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.”


हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही.


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan