Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 आणि तुम्हांला सर्वकाळचा कलंक लावीन; जिचा कधी विसर पडणार नाही अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 मी तुम्हावर कधीही विसरु शकणारी अप्रतिष्ठित आणि बदनामी ही आणीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:40
10 Iomraidhean Croise  

तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.


पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.


“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्‍यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.


तू आपल्या बहिणीस आपल्याहून निर्दोष ठरवलेस ह्याची अप्रतिष्ठा तू भोग; तू त्यांच्याहून घोर पापे केल्यामुळे तुझ्या मानाने त्या अधिक निर्दोष मानल्या पाहिजेत; तुझ्या बहिणी अधिक नीतिमान आहेत हे तू दाखवलेस, म्हणून तू फजीत व लज्जित हो.


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2


आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुला नेईल त्या त्या सर्वांना तू आश्‍चर्याचा, म्हणीचा व थट्टेचा विषय होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan