Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पाहा! परमेश्वराकडून वादळ येत आहे. त्याचा राग बाहेर जात आहे, आणि ती क्रोधाच्या वादळाची भोवळ आहे. ती दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:19
19 Iomraidhean Croise  

तुमच्या पातेल्यांना कांटेर्‍या जळणाची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्चे असो, शिजलेले असो, ते तो वावटळीने उडवून देईल.


वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील.


वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्‍या पायासारखा आहे.


समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.


पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल.


पाहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे; धुव्वा उडवणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


परमेश्वर आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध मागे फिरणार नाही; हे पुढील काळात तुम्हांला समजेल.”


त्या काळी ह्या लोकांना व यरुशलेमेस म्हणतील, “रानातील उजाड टेकड्यांवरून उष्ण वारा माझ्या लोकांच्या कन्येवर येत आहे, तो काही विंझणवारा म्हणून किंवा स्वच्छ करण्यासाठी येत नाही.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी बाबेलवर व लेब-कामाईच्या1 रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे.


मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan