Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की, परमेश्वराने तुम्हास शांती देऊ केली आहे, आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात, तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात, ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:17
34 Iomraidhean Croise  

तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरीया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस.


ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


दुर्जनांना शांती नाही असे माझा देव म्हणतो.”


ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल.


तरी ते म्हणतात, ‘काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार; आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार.’


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील. कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे; ह्यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”


ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.


तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात.


तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


ह्याचे कारण हेच की त्यांनी माझ्या लोकांना बहकवले आहे, शांती नसता ‘शांती आहे’ असे त्यांनी म्हटले आहे आणि माझे लोक तट बांधत असता, पाहा, त्याला ते कच्चा चुना लिंपीत आहेत.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


कारण ज्या नीतिमानास मी दुखवले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखवता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव वाचू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता;


माझ्या लोकांतले जे सर्व पापी जन, ‘आम्हांला अनिष्ट गाठणार नाही, ते आमच्यावर येणार नाही,’ असे म्हणतात ते तलवारीने मरतील.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


“मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणार्‍या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?’


तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”


जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”


आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कूळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा! कोण जाणे! विष व कडूदवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल!


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan