Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा ते उत्तर देतील की, ‘त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याचा करार मोडला व अन्य देवांना भजून त्यांची सेवा केली म्हणून.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ह्यावर दुसरा उत्तर देईल, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:9
16 Iomraidhean Croise  

आणि हे मंदिर उंच स्थानी राहील तरी त्याच्या जवळून येणारेजाणारे चकित होतील व छीथू करून म्हणतील, परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?


कारण ह्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे, म्हणून ह्या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हायचा नाही.


कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.


त्यांच्या वडिलांनी माझ्या वचनांकडे कान देण्याचे नाकारले, त्याच त्यांच्या दुष्कर्माकडे ते वळाले आहेत; अन्य देवांची सेवा करण्यास ते त्यांच्यामागे लागले आहेत; इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी, त्यांच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे.


तू त्यांना सांग, परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे.


तेव्हा तू त्यांना सांग, ‘परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडले, माझे नियमशास्त्र पाळले नाही.


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


परमेश्वर म्हणतो, “मी त्यांच्यापुढे ठेवलेले माझे नियमशास्त्र त्यांनी सोडले, त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत.


तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


तुम्ही त्यांचे मार्ग व त्यांची कर्मे पाहाल, तेव्हा त्यामुळे तुमचे सांत्वन होईल; आणि मी जे तिच्यात सर्वकाही केले आहे त्यांतले काहीही विनाकारण केले नाही हे तुम्हांला समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


राष्ट्रांना समजेल की इस्राएल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले; त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला म्हणून मी त्यांच्यापासून आपले मुख लपवले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले.


मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे;


तेव्हा ते, किंबहुना सर्व राष्ट्रांतले लोक विचारतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan