Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:6
26 Iomraidhean Croise  

मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले.


सुपीक जमिनीची तेथे राहणार्‍यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करतो.


अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.


त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणात बसवलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचा बांधा लबानोनासारखा आहे; तो गंधसरूसारखा उमदा आहे;


तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.


तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका :


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


“परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याचा पुत्र कोन्या2 माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी तेथून मी तुला काढून फेकून देईन.


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल; तुमची जन्मदात्री लाजेल; पाहा, ते अगदी कनिष्ठ राष्ट्र, वैराण जंगल व शुष्क भूमी होईल.


हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.


गिलादात मलम नाही काय? तेथे कोणी वैद्य नाही काय? माझ्या लोकांच्या कन्येचे घाय का बरे झाले नाहीत?


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


हे लबानोना, आपल्या वेशी उघड म्हणजे अग्नी तुझे गंधसरू भस्म करील.


रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.


तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan