Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:5
22 Iomraidhean Croise  

“परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस;


पण जर तुम्ही बहकून जे नियम व आज्ञा मी तुम्हांला विहित केल्या आहेत त्या न पाळाल आणि जाऊन अन्य देवांची उपासना व त्यांचे भजनपूजन कराल,


आणि हे मंदिर उच्च स्थानी राहील तरी ह्याच्याजवळून जाणारेयेणारे चकित होऊन म्हणतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?’


तेव्हा लोक म्हणतील, ‘त्यांच्या वाडवडिलांचा देव परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून आणले त्याला सोडून ते अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजनपूजन व उपासना करू लागले त्यामुळे त्याने ही सर्व विपत्ती त्यांच्यावर आणली आहे.”’


म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


“मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे.


पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’


त्यांना सांग की, ‘परमेश्वर असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुमच्यापुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही,


खास्दी लोकांनी राजगृह व लोकांची घरे अग्नीने जाळली व यरुशलेमेचा कोट मोडून टाकला.


तरीपण यहूदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की अखिल मिसर देशात, ‘परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणायला माझे नाम यहूदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही.


प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.”


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’


आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही?


देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटले की,


म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan