Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मी तुला व तुला जन्म देणार्‍या तुझ्या आईला तुमची जन्मभूमी नव्हे अशा देशात फेकून देईन; तेथे तुम्ही मराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मी, तुला व तुझ्या आईला, जिने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:26
16 Iomraidhean Croise  

त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले; राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक ह्यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले.


यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव नेहूष्टा; ती यरुशलेमेच्या एलनाथानाची कन्या.


यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी बाबेलचा राजा अबील-मरोदख राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याला कारागृहातून काढून त्याचा सत्कार केला.


त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.


त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.


पाहा, परमेश्वर तुला बलवान पुरुषाप्रमाणे झुगारून देणार आहे; तुला मगरमिठीत धरणार आहे.


कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी ह्या प्रसंगी ह्या देशाचे रहिवासी गोफणीतून भिरकावतो, मी त्यांना अशी पीडा करतो की ती त्यांना जाणवेल.”


राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.”


ह्याकरता जो तुम्हांला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हांला ह्या देशातून घालवून देईन; तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल; कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही.’


ज्या देशात परत येण्याची ते वांच्छा करतील त्यात ते परत येणार नाहीत.”


यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”


यकन्या राजा, राजमाता, खोजे, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार, कारागीर व लोहार हे यरुशलेमेतून गेल्यावर ते त्याने पाठवले.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan