यिर्मया 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुझा जीव घेण्यास टपणार्यांच्या हाती, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हाती, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, खास्द्यांच्या हाती मी तुला देईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि तुझा वध करू पाहणार्यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा. Faic an caibideil |
परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’