Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळील, आणि तुझे मित्र पाडावपणात जातील. मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे लज्जित व फजीत होशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आता वार्‍याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील, तुमच्या सर्व मित्रांना बंदिवासात नेण्यात येईल. मग तुम्ही शरमिंदे व्हाल व तुमच्या सर्व दुष्टपणामुळे तुम्ही तुमची प्रतिष्ठा घालवाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:22
24 Iomraidhean Croise  

आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत; ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे.


बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे, त्यांनी माझे वतन पायाखाली तुडवले आहे, त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे.


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.


‘परमेश्वर कोठे आहे?’ असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणार्‍यांनी मला जाणले नाही; लोकपालही1 माझ्यापासून फितले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.


तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.


तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’


परमेश्वर म्हणतो, ते मला संताप आणतात? का स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात?


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


वार्‍याने त्यांना आपल्या पंखांत लपेटून टाकले आहे; ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.


कळपास सोडून देणार्‍या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो! त्याच्या बाहूवर व त्याचा उजव्या डोळ्यावर तलवार चालेल; त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.”


मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan