Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 “लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 “लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर. अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “लबानोनात जा व विलाप करा, बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे, अबारीमाहून आरोळी मारा, कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:20
22 Iomraidhean Croise  

मिसर देशाचा राजा कधी आपला देश सोडून बाहेर पडला नाही, कारण मिसर देशाच्या नाल्यापासून महानद फरात येथवर जो सर्व मुलूख मिसरी राजाचा होता तो बाबेलच्या राजाने काबीज केला होता.


तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे; त्या सगळ्यांना तर वारा उडवून नेईल, एक फुंकर त्यांना घेऊन जाईल; पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल.


आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.


वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो.


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


मी आपल्या वल्लभांना बोलावले, पण त्यांनी मला दगा दिला आहे; आपला जीव वाचवावा म्हणून आपल्यासाठी अन्न शोधता शोधता माझे याजक व माझे वडील जन नगरात मेले.


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


ह्यामुळे अगे अहलीबे, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, ज्या तुझ्या जारांवरून तुझे मन उडाले आहे त्यांना मी तुझ्याविरुद्ध उठवीन त्यांना तुझ्यावरून चोहोकडून आणीन;


ह्यामुळे मी तिला तिच्या जारांच्या स्वाधीन केले, ज्या अश्शूरी पुरुषांवर ती आसक्त झाली होती त्यांच्या हाती तिला दिले.


त्यांनी तुझी वल्ही बाशानातील अल्लोनाच्या झाडांची केली; तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातल्या अश्शूरी (बाक्स) लाकडाच्या केल्या असून हस्तिदंताने जडलेल्या होत्या.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्राएल लोकांना देऊ केलेला आहे तो तेथून पाहा.


“मवाब देशात यरीहोसमोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्राएल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पाहा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan