Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरूशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरूशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल— त्याला सिंहासनावरून फरफटत आणून यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:19
13 Iomraidhean Croise  

ह्यास्तव, पाहा, मी यराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणीन, यराबामाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करीन, मग तो इस्राएलाच्या बंदीत असो की मोकळा असो; ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकतात त्याप्रमाणे मी यराबामाचे घराणे काढून टाकीन.


यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव जबूदा; ती रुमा येथला पदाया ह्याची कन्या.


यहोयाकीम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.


तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हाताचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही.


त्याच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायांत बेड्या ठोकल्या.


कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.


“परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यावर चार गोष्टी आणीन : ठार करण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे.


“ह्यास्तव यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास कोणी राहणार नाही व त्याचे शव फेकण्यात येईल, ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील.


म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव; तसेच यहूदाच्या नगरांतून येणार्‍या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


सभोवतालच्या निरनिराळ्या प्रांतांतील राष्ट्रे त्याच्यावर उठली; त्यांनी त्याच्यावर आपले जाळे टाकले; त्यांनी केलेल्या खाचेत तो अडकून पडला.


उघड्या मैदानात तू पडशील, कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan